संगमेश्वर (सत्यवान विचारे) : चिपळूण तालुक्यातील पोफळी गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र कारागृह विभागात कार्यरत असलेले संजीव सखाराम घाणेकर यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र कारागृह सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. संजीव घाणेकर यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कर्तव्य बजावत कारागृह विभागात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या दीर्घकाळच्या सेवेमुळे त्यांना यापूर्वीही केंद्र शासनाच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सन 2018 मध्ये त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले होते. घाणेकर हे सन १९९२ मध्ये सेवेत रुजू झाले. सेवाकाळात त्यांनी विविध ठिकाणी आपली कर्तव्यनिष्ठ सेवा बजावली असून, कोल्हापूर, सांगली तसेच पुणे परिसरात त्यांनी सेवा केली आहे. सध्या ते पुणे येथील येरवडा कारागृहात सुभेदार म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या ५८व्या वर्षीही ते आपले कर्तव्य तितक्याच निष्ठेने पार पाडत आहेत.१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव करण्यात आल्याने पोफळी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत शासकीय सेवेत दीर्घकाळ प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या संजीव घाणेकर यांच्या कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिक सेवेला मिळालेला हा सन्मान भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. पोफळी गावचे सुपुत्र संजीव घाणेकर यांनी आपल्या सेवेतून गावाचे नाव उज्ज्वल केले असून, त्यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.