loader
Breaking News
Breaking News
Foto

संविधान बदलण्याची भाषा करणार्‍यांना धडा शिकवू, रामदास आठवलेंचा इशारा

चिपळूण, (वार्ताहर) - संविधान बदलण्याची भाषा करणा़र्‍यांना धडा शिकवू. मग त्यासाठी आपले मंत्रीपद गेले तरी चालेल असे रोखठोक विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे (आठवल गट) राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केले. सत्तेच्या माध्यमातून विकास साधता येतो, समाजातील घटकांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आपण सत्तेत जायला हवं असं आवाहन ही त्यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना केले. चिपळूणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यावतीने रविवारी शहरातील शिक्षक पतपेढी सभागृह येथे जिल्हास्तरीय मेळावा तसेच केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जाहीर सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमला रिपब्लिकन पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या भाषणात ना. आठवले म्हणाले की, आपण ज्या पक्षासोबत जातो, त्या पक्षाला सत्ता मिळते आणि आपल्याला मंत्रीपद मिळते. समाजहिताचा विचार करून कोणत्या तरी पक्षाला सोबत घेऊन सत्ता निर्माण करण्यासाठीची आपली भूमिका असायला हवी. सध्याच्या राजकीय परिस्थितीत लक्षात घेता एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवणे अवघड आहे. समाजाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम केले पाहिजे. संविधान बदलण्याची भाषा करणा़र्‍यांस धडा शिकवू. यासाठी आपले मंत्रीपद गेले तरी चालेल असे खा. रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg