loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण नगरपरिषदेतर्फे जलसंधारण दिन साजरा

मालवण (प्रतिनिधी) - जलसंधारणाचे महत्त्व, पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती' अशा विविध उद्देशाने मालवण नगरपरिषदेतर्फे जलसंधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रॉक गार्डन येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत आग्रही नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जलसंधारणासोबतच वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या दरम्यान 'पाणी वाचवा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा' हा संदेश देत उपस्थितांनी जलसंधारण व पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg