मालवण (प्रतिनिधी) - देशातील युवा विद्यार्थिनींना येणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी आणि सामाजिक समानतेच्या अधिकारांशी संबंधित अडचणींवर थेट संवाद साधण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील 'छात्रों की गूंज' या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आतापर्यंत ३६ विद्यार्थिनींनी नोंदणी पूर्ण केली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
हा मार्गदर्शन आणि संवाद सोहळा २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील आर. टी. ओ. मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या एआयएसएसएमएस इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड गेट नं. १ येथे आयोजित करण्यात आला आहे. आजच्या काळात शिक्षण घेताना विद्यार्थिनींना अनेक आर्थिक व सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी, भविष्यातील करिअरची दिशा आणि सामाजिक समानतेचे अधिकार यांवर राहुल गांधी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधतील. विद्यार्थिनींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, भविष्यातील विचारांना स्पष्टता देणे आणि जॉब संदर्भातील बिकट परिस्थितीला धैर्याने कसं सामोरे जायचं, याचे थेट मार्गदर्शन या कार्यक्रमातून केले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या ऐतिहासिक संवादाचा भाग होण्यासाठी मुलींमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून ३६ मुलींची नोंदणी झाली आहे. अजूनही ज्या विद्यार्थिनींना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी दिलेल्या क्यू आर स्कॅनरवर जाऊन 'छात्रों की गूंज' उपक्रमांतर्गत आपली नोंदणी पूर्ण करावी. अधिक माहिती व संपर्कासाठी ९८९२०५५८२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मोंडकर यांनी केले आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.