loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरीचे २४ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन

खेड - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरी तर्फे सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेमध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 15 मार्च 2024 च्या संच मान्यता शासन निर्णयाच्या अनुषंगाने पदवीधर शिक्षकांचे उपशिक्षक पदी झालेले समायोजन, पवित्र पोर्टल मधून गणित विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी निघालेली जाहिरात व पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटीच्याच्या बाबतीत एक वर्ष होऊनदेखील जिल्हा परिषदेकडून न झालेली कार्यवाही या बाबींचा विचार करता जिल्हा परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणताही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे शिक्षकांच्या ज्वलंत व जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे जिल्हाव्यापी आंदोलन रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या धरणे आंदोलनामध्ये खेड तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे यासाठी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, प्राथमिक शिक्षक पतपेढी चेअरमन सुनील दळवी, तालुका नेते बबन साळवी, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, प्रसिद्धीप्रमुख राजेश भागणे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, संतोष बर्वे आदी मेहनत घेत आहेत. या आंदोलनाला खेड तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर व दिलीप यादव यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg