loader
Breaking News
Breaking News
Foto

चिमुकल्या हातांनी बाप्पाची सेवा; धामणीत गणेशमूर्तीला रंगरंगोटीचा साज

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील लिंगायत बंधूंच्या चित्रशाळेत गणेशमूर्तींना रंगरंगोटी करून आकर्षक साज चढविण्याचे काम उत्साहात सुरू आहे. या कामात प्राथमिक शाळेच्या सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी ११ वर्षीय हेमल उल्हास लिंगायत मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लहान वयातच कलेची आणि गणेशभक्तीची आवड निर्माण झालेल्या हेमलच्या चिमुकल्या हातांनी गणेशमूर्तींवर बारकाईने रंगकाम केले जात आहे. बाप्पाच्या मूर्तीला सुबक आणि आकर्षक रंग देताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह आणि एकाग्रता लक्षवेधी ठरत आहे. लिंगायत कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली हेमल गणेशमूर्ती रंगविण्याची कला आत्मसात करत आहे. अभ्यासासोबतच पारंपरिक कलेची आवड जोपासत गणरायाच्या सेवेत सहभागी होण्याचा तिचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. तिच्या सहभागातून ‘कलेसोबत संस्कार आणि भक्तीची जोड’ असा सुंदर संदेशही मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

गणेशमूर्तींना रंग देताना हेमल अतिशय काळजीपूर्वक आणि मन लावून काम करत असून, तिच्या या कलेचे धामणी परिसरात कौतुक होत आहे. लहान वयातच पारंपरिक कलेची आवड जोपासणाऱ्या हेमलमुळे गणेशमूर्ती रंगविण्याच्या कलेला पुढची पिढी मिळत असल्याचे समाधान लिंगायत कुटुंबीय व्यक्त करत आहेत. “बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळतेय, याचा मला खूप आनंद आहे. बाप्पाच्या मूर्तीला रंग देताना मला खूप छान वाटते,” अशा भावना हेमल लिंगायत हिने व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg