loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय जाधव यांना पालिका कर्मचारी, अधिकारी कायम स्मरणात ठेवतील - डॉ. संजय बापेरकर

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई महानगरपालिकेचे माजी प्रमुख अभियंता व फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील एक विचारवंत दिवंगत संजय महादेव जाधव अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले होते. त्यांनी पालिकेत अभियंता म्हणुन रुजु झाल्यावर अनेक कर्मचारी - अधिका-यांना त्यांच्या अडी-अडचणीच्यावेळी मदत केली. त्यामुळे पालिका कर्मचारी व अधिकारी त्यांना कायम स्मरणात ठेवतील, असे प्रतीपादन कामगार नेते डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी पुण्यानुमोदन व शोकसभेवेळी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि.संजय जाधव यांचे ८ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पुण्यानोमोदन आणि शोकसभेचे आयोजन दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते, यावेळी बापेरकर बोलत होते. पालिकेतील अधिकार्‍यांचे ‘ऋणानुबंध अभियान’ व पहिली मान्यताप्राप्त मागासवर्गिय संघटना ‘बीएमसी एससी एसटी व्हिजेएनटी,ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन’ चे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याचा आढावा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी सदर श्रद्धांजली सभेत घेतला.

टाईम्स स्पेशल

‘बौद्धजन पंचायत समिती’ ईमारतीच्या बांधकामाला पालिकेची परवानगी मिळवून देताना दिवंगत संजय जाधव यांचा मोलाचा वाटा होता, असे पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले. त्यांनी आपल्या दापोली विभागात बौद्ध मेडिटिटेशन सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ‘ऋणानुबंध अभियान’चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले. माजी अभियंता सत्यप्रकाश सिंह, सहाय्यक अभियंता प्रशांत जगताप, तेलुगू टीमचे प्रमुख नागसेन मालाजी आदींनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg