loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वीफ्ट कारची स्कुटरला समोरासमोर धडक; पत्रकार आमीर तारलेकर यांचे अपघाती निधन

म्हाप्रळ (प्रतिनिधी) - अपूर्ण म्हाप्रळ भोर ते पंढरपूर मार्गावरील एका पुलाच्या बांधकामासाठी पर्यायी रस्त्यावर एका स्वीफ्ट कारची स्कुटरला समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पोलादपूर तालुक्यातील सवाद येथील पत्रकार आमीर तारलेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील स्कूटरवरील आमीर तारलेकर यांचे भाऊ गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाड व पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील म्हाप्रळ भोर ते पंढरपूर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून रस्त्यासह पुलांचे बांधकाम अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे सातत्य कायम आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आमीर शौकत तारलेकर आणि त्यांचा भाऊ शब्बीर तारलेकर हे दोघेही सुझुकी बर्गमन (क्र. एम एच ०६ सीइ-२३३५) स्कूटरवरून सवाद येथील घराकडे परतत असताना महाड तालुक्यातील भोराव फाट्याजवळ असलेल्या एका अपूर्ण पुलानजीकच्या पर्यायी रस्त्यावर भोरच्या दिशेने समोरून स्विफ्ट कार (क्र. एमएच २४ बीआर ८३७२) भरधाव वेगाने आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली.

टाईम्स स्पेशल

या अपघातात पत्रकार आमीर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूटरवर मागे बसलेला त्यांचा भाऊ शब्बीर तारलेकर हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून स्वीफ्ट कार चालक गणेश धन्यकुमार देवकाते (रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg