म्हसळा : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या कोकण टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटतर्फे शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. शहरातील घनसार कॉम्प्लेक्स येथे आयोजित या कार्यक्रमात विविध संगणक अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या तालुक्यातील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेतर्फे लवकरच कोकण टेक एआय (Artificial Intelligence) कोर्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
परदेशातील नोकरीचा अनुभव बाजूला ठेवून आयटी इंजिनिअर नबील गफूर काझी हे गेल्या पाच वर्षांपासून म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना संगणक व डिजिटल क्षेत्रातील आधुनिक ज्ञान मिळावे यासाठी कार्यरत आहेत. कोकण टेकच्या माध्यमातून विविध डिजिटल व संगणक आधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने संस्थेतर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला मौलाना अब्दुल कलाम आझाद फाउंडेशनचे माजी चेअरमन हबीब फकी, नायब सदर मुबशीर जमादार, एकता सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद उकये, माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, नगरसेविका राखी करंबे, म्हसळा जमातचे सचिव साजिद हुरझुक, शुहेब घराडे, मौलाना अब्दुल मतीन, अब्दुल शकूर घनसार, फहद पेणकर, नवाब वजिरी आदी मान्यवर उपस्थित होते.




































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.