loader
Breaking News
Breaking News
Foto

‘‘पहिला मी मनसैनिक’’, राज ठाकरेंच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जितेंद्र चव्हाण यांचा निर्धार! ‘‘जुन्या-नव्याचा भेद विसरून सर्वांनी एकदिलाने काम करूया’’; मध्य रत्नागिरीत मनसेला नव्या जोमाने उभे करण्याचा संकल्प

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची बाबदारी स्वीकारल्यानंतर जितेंद्र चव्हाण यांनी आपल्या भूमिकेतून पदापेक्षा पक्षनिष्ठेला आणि नेतृत्वापेक्षा कार्यकर्तेपणाला प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. मी जिल्हाध्यक्ष असलो तरी सर्वप्रथम मी मनसैनिक आहे. माझी खरी ओळख ही मनसेचा कार्यकर्ता म्हणूनच आहे, अशी ठाम भूमिका चव्हाण यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून, राजसाहेबांना अपेक्षित असलेले काम करण्याची जबाबदारी संपूर्णपणे माझी आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मध्य रत्नागिरीत पक्षाची संघटना अधिक सक्रिय, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनसेच्या संघटनात्मक वाटचालीत जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही भेद राहू नये, अशी स्पष्ट भूमिका चव्हाण यांनी घेतली आहे. आता जुने-नवे काही नाही. आपण सर्वांनी मनसैनिक म्हणून एकत्र काम करूया, असा थेट संदेश त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव आणि नव्या कार्यकर्त्यांची ऊर्जा यांची सांगड घालून संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका स्वीकारल्यास मध्य रत्नागिरीत मनसेला नव्या उमेदीने उभारी मिळू शकते.

टाइम्स स्पेशल

जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतरही स्वतःला ‘पहिला मनसैनिक’ म्हणत चव्हाण यांनी पदापेक्षा जबाबदारी मोठी असल्याचा संदेश दिला आहे. जनतेचे प्रश्न, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि संघटनेची वाढ यांना प्राधान्य देत प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. राज ठाकरे यांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचविणे, मनसेची संघटनात्मक ताकद वाढविणे आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट निर्णायक ठरणार आहे. मध्य रत्नागिरीत मनसेची नव्याने बांधणी करताना जुन्या-नव्याचा भेद न करता प्रत्येक मनसैनिकाला सोबत घेण्याचा निर्धार चव्हाण यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे. संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असून, त्याच्या ताकदीवरच मनसेची आगामी वाटचाल अधिक प्रभावी होऊ शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg