loader
Breaking News
Breaking News
Foto

सीआरझेड संदर्भातील लढ्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडून ५ लाखांचा निधी जाहीर - रविकिरण तोरसकर

​मालवण, (प्रतिनिधी) : किनारपट्टी नियमन क्षेत्र कायद्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करणे, जनजागृती करणे आणि न्यायालयीन लढ्यासाठी मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी तब्बल ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे अशी माहिती सीआरझेड जनजागृती समन्वय समितीचे रविकिरण तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल चिवला बीच येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी जॉन नऱ्होना, पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, रवींद्र खानविलकर, टीटीडीएसचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, प्रसन्न मयेकर, रुजाय फर्नाडिस, सुधीर कांदळकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे मालवण आणि परिसरातील किनारपट्टी भागातील स्थानिक रहिवाशांना आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ​आमदार निलेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांत सीआरझेड कायद्यासंदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांनी या लढ्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असून प्रशासकीय व धोरणात्मक बदलांसाठी मोठा पुढाकार घेतला आहे. या न्यायालयीन व सामाजिक लढ्याला बळ देण्यासाठी आमदार राणे यांनी स्वतःच्या माध्यमातून ५ लाख रुपयांचा निधी दिला असून, या कामासाठी लवकरच एक पूर्ण वेळ समिती गठित केली जाणार आहे. किनारपट्टी भागातील सर्वेक्षणाचे काम सुरू असून, स्थानिक रहिवाशांची सुमारे ७० टक्के बांधकामे अधिकृत करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

टाईम्स स्पेशल

पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखून स्थानिक लोकांच्या हिताचे आवश्यक धोरणात्मक बदल केंद्र सरकारकडून घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती तोरसकर यांनी दिली. आमदार निलेश राणे यांनी दाखवलेल्या राजकीय इच्छाशक्तीबद्दल आणि दिलेल्या निधीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. हा कायदा पर्यावरणरक्षणासोबतच स्थानिकांचे जीवन सुकर करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg