मालवण (प्रतिनिधी) - मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या वतीने महिलांसाठी भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथील कस्टम ऑफिस शेजारी, मेन गेट येथे करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेचे ११ वे वर्ष असून विजेत्या महिलांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण बंदर जेटी येथील हॉटेल राजभोग येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, मंडळाच्या सल्लागार ॲड. अमृता मोंडकर, मंडळाचे सदस्य देवानंद लुडबे, कोळंबच्या सरपंच सिया धुरी, वायरी भूतनाथच्या उपसरपंच प्राची माणगावकर, आर्या मुणगेकर, शुभदा पाडगावकर, रेश्मा खांदारे, स्नेहल मेथर, रुद्राक्ष कांदळकर, अवनीश मेथर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास फ्रिज, सोन्याची नथ आणि पैठणी, द्वितीय क्रमांकास मिक्सर, सोन्याची नथ व पैठणी, तृतीय क्रमांकास कुकर, चांदीची पैंजण व पैठणी, तर चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास गॅस शेगडी, चांदीची पैंजण व पैठणी देण्यात येणार आहे. तसेच प्रथम व द्वितीय विजेत्यास आर्या हेल्थ क्लब कडून १० लाखांचा विमा व आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारी महिला कधीही तीन वेळा प्रथम क्रमांकाने जिंकेल अशा महिलेस विशेष प्रविण्य म्हणून ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे. तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आर्या हेल्थ क्लब मार्फत्त तीन दिवशीय ऑनलाईन फ्री ट्रायल व आरोग्यविषयी मोफत मार्गदर्शन करण्यात येईल. स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना सामाजिक संदेश असलेली कुपन देण्यात येणार असून या कुपनद्वारे लकी ड्रॉ काढण्यात येतील. लकी ड्रॉ विजेत्यास आकर्षक बक्षीसे देण्यात येईल.
दि. २७ रोजी सायंकाळी ४ वाजता व्यापारी संघाच्या वतीने समुद्राला श्रीफळ अर्पण झाल्यानंतर स्पर्धा सुरु होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना नारळ मंडळाच्या वतीने मोफत देण्यात येतील. स्पर्धेदरम्यान नामवंत नृत्य कलाकार कोळी नृत्य सादरीकरण करतील. तसेच जादूगार निखिल यांचे जादूचे प्रयोग सादर होतील. तसेच या स्पर्धेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली. महिलांनी या पारंपरिक नारळ लढवणे स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.