loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर आगारात राजमाता जिजाऊ बसचा लोकार्पण सोहळा संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून गुहागर आगाराला एकूण पाच राजमाता जिजाऊ बस प्राप्त झाल्या असून या पाच बसेसचा लोकार्पण सोहळा गुहागर आगारामध्ये संपन्न झाला. यावेळी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ या पाच बसेसचे पूजन करण्यात आले. यावेळी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर व सर्व महायुतीचे कार्यकर्ते व एस टी महामंडळाचे अधिकाऱ्यांनी गुहागर ते मोडकाआगर असा बसचे तिकीट काढून बसमधून प्रवासाचा आनंद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले की, गुहागर आगार मध्ये एकूण पाच राजमाता जिजाऊ बसचे उद्घाटन सर्वांच्या उपस्थितीत झाले आहे. या बसची पहिली फेरी गुहागर आगार ते मोडकाआगर अशी सोडण्यात आली आहे, युती सरकारच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुहागर आगाराला राजमाता जिजाऊच्या एकूण दहा बसेस देण्यात येणार आहेत, यापैकी पहिल्या पाच बसेसच्या आगमन झालेले आहे. उर्वरित पास बस मिळतील असे आश्वासन देखील परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहे, गुहागर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता गुहागर आगाराला पाच मिनीबसची मागणीसुद्धा आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेले आहे. लवकरात लवकर या मिनीबस गुहागर आगारमध्ये दाखल होतील, गणपती उत्सवापूर्वी या बसेस येणे अपेक्षित होते. त्यातील पाच बसेस आपल्याला युती सरकारच्या माध्यमातून मिळाल्या आहेत, या बसेसचे आम्ही स्वागत केले आहे.

टाईम्स स्पेशल

राजमाता जिजाऊ बसच्या उद्घाटन प्रसंगी बसमधून प्रवास करताना सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच या बसमधून प्रवास करत आहेत हा आनंद खूप मोठा आहे. या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या एस.टी. बस मधून प्रवास करावा, असे आवाहन केले. यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, नगरसेवक अमरदीप परचुरे, अमोल गोयथळे, साईनाथ कळझुणकर, सचिन ओक, पत्रकार गणेश किर्वे, प्रभारी गुहागर आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, वाहतूक निरीक्षक स्वप्नील शिंदे, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष मनीष खरे, सेक्रेटरी सुधाकर कांबळे, पास्ट प्रेसिडेंट संतोष वरंडे, लाईन सदस्य अमिष कदम उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg