loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएचडीधारक तीन महिला वकिलांचा सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे नागरी सत्कार

सावंतवाडी(प्रतिनिधी)- विविध विषयांवर विद्यावाचस्पती (पीएचडी) ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या तीन महिला सभासदांचा सावंतवाडी वकील कक्षात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. अश्विनी लेले, अस्मिता अच्युत सावंत-भोसले आणि शितल अभिजित टिळवे अशी सत्कारमूर्ती महिला वकिलांची नावे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या तिन्ही महिला सभासदांनी पीएचडी पदवी मिळवून सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या प्रतिमेत मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी मिळवलेले यश हे वकील संघटनेच्या इतर सभासदांना मार्गदर्शक व प्रोत्साहन देणारे आहे, अशा शब्दांत ऍड. दिलीप नार्वेकर यांनी कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना तिन्ही सत्कारमूर्तींनी हा आपल्या घरातीलच सत्कार आहे, असे सांगत सावंतवाडी वकील संघटनेचे आभार मानले. ऍड. डॉ. अस्मिता सावंत यांनी पीएचडी पूर्ण करण्याची प्रक्रिया विशद केली. आता या तिन्ही महिला वकील नवीन संशोधन व प्रबंध लिहिणार्‍यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सावंतवाडी वकील संघटनेचे ऍड. राघवेंद्र नार्वेकर, ऍड. परशुराम चव्हाण, ऍड. अनिल केसरकर, ऍड. माधवी पेंडूरकर, ऍड. धनंजय पेंडूरकर, ऍड. तृप्ती सावंत, ऍड. वामन निर्गुण, ऍड. रत्नाकर गवस, ऍड. समीर वंजारी, ऍड. राहुल मडगावकर, ऍड. विजय शंभरकर, ऍड. पूजा ओटवणेकर, ऍड. वर्षा गावकर, ऍड. प्रिया भावे, ऍड. मेघा परब, ऍड. बकले, लॉ कॉलेजच्या उपप्राचार्य वेंगुर्लेकर, अडॅ. सिद्धार्थ भांबुरे, ऍड. सुखानंद सावंत, ऍड. दत्तप्रसाद ठाकूर यांच्यासह वकील संघटनेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. स्वप्निल कोरगावकर यांनी केले, तर आभार सावंतवाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. बाळाजी रणशूर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg