loader
Breaking News
Breaking News
Foto

चोरीचा टेम्पो सापडला; आरोपी गजाआड, पळस्पे महामार्ग पोलिसांची तत्पर कारवाई

पनवेल : जनरेटरसह चोरीला गेलेला टाटा ४०७ टेम्पो अवघ्या काही तासांत शोधून काढत एका संशयिताला ताब्यात घेण्यात पळस्पे महामार्ग पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक केदार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री गस्तीवर असताना अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन कुमार कागले यांनी पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे ड्युटी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक केदार भीमराव कुंभार यांना फोनवरून चोरीच्या टेम्पोबाबत माहिती दिली. एमएच ०४ डीटी ३७८१ क्रमांकाचा सिल्व्हर रंगाचा टाटा ४०७ टेम्पो जनरेटरसह चोरीला गेला असून तो पुण्याच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माहिती मिळताच केदार कुंभार यांनी पोलीस हवालदार किरण सुरेश महाजन व अतुल माणिकराव जगताप यांच्यासह परिसरात शोधमोहीम सुरू केली. महामार्गावरील अमेठी पार्किंग परिसरात गस्त घालत असताना एका वाहनाच्या आडोशाला संशयास्पदरीत्या उभा असलेला टेम्पो पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता तो चोरीला गेलेला असल्याचे स्पष्ट झाले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन कुमार कागले यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

टाईम्स स्पेशल

अधिक चौकशीत चालकाचे नाव कुंदन कुमार मिश्रा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेत संशयित आरोपी मिश्रा याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अँटॉप हिल पोलिसांच्या ताब्यात दिले. पळस्पे महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा टेम्पो अल्पावधीतच हस्तगत झाल्याने पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg