loader
Breaking News
Breaking News
Foto

रेडी येथील श्री माऊली मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

रेडी - रेडी येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. गुरुवार २० ऑगस्ट ते गुरूवार २७ ऑगस्ट या कालावधीत हा सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहानिमित्त श्री माऊली देवीची विविध रूपांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून, मंदिर परिसराचीही सुंदर आरास करण्यात आली आहे. तसेच गावातील वेगवेगळे चित्ररथ सुद्धा आकर्षण ठरणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसराला भक्तिमय व प्रसन्न वातावरण प्राप्त झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सप्ताहादरम्यान मंदिरात अखंड हरिनाम यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. या धार्मिक सप्ताहात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री माऊली देवीचे दर्शन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवी माऊली देवस्थान रेडी व ग्रामस्थांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg