loader
Breaking News
Breaking News
Foto

दिविजा वृद्धाश्रमातील ७२ वर्षीय निराधार वृद्धाचा सेवाभावी जीवनप्रवास

देवगड (प्रतिनिधी) - दिविजा वृद्धाश्रमात गेली पाच वर्षे निराधार म्हणून वास्तव्यास असलेले शंकर पांडुरंग सावंत (वय ७२) यांचे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता निधन झाले. मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे, या भावनेतून त्यांच्या नेत्रदानासह देहदान करण्यात आले. सावंत आजोबा काही वर्षांपूर्वी शारीरिकदृष्ट्या त्रासलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अनोळखी व्यक्ती म्हणून दाखल झाले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली. ओरोस रुग्णालयाच्या काउन्सिलर रेश्मा बाईप यांच्या माध्यमातून त्यांना दिविजा वृद्धाश्रमात प्रवेश मिळाला. गेली पाच वर्षे ते आश्रमातील इतर वृद्धांसोबत आनंदाने राहत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वयोमानानुसार त्यांची दृष्टी कमी झाल्यानंतर दिविजा वृद्धाश्रमाचे सचिव संदेश शेट्ये यांच्या पुढाकाराने विवेकानंद नेत्रालय, कणकवली यांच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शंकर सावंत यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांच्या निधनानंतरची सर्व कार्यवाही आश्रम व्यवस्थापनाने केली. ऑगस्ट २०२३ मध्येच त्यांचा नेत्रदान व देहदानाचा फॉर्म भरून ठेवण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे नेत्रदान करण्यात आले, तर त्यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील शरीररचनाशास्त्र विभागाकडे वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या कार्यासाठी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे चीफ को-ऑर्डिनेटर डॉ. विद्याधर तायशेटे, विभागीय को-ऑर्डिनेटर प्रमोद लिमये, सिव्हिल हॉस्पिटलचे Opthalmic Officer कौस्तुभ देशपांडे व डॉ. प्राजक्ता थेटे यांनी सहकार्य केले. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीप्रमाणे शंकर आजोबांनी मृत्यूनंतरही नेत्रदान व देहदानातून समाजाला प्रेरणादायी संदेश दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg