loader
Breaking News
Breaking News
Foto

फारेस अहमद बोकुमाझ कुवेत यांच्यावतीने फिशरीज सोसायट्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न

खेड : मच्छीमार बांधवांना शासनाच्या विविध योजना, तसेच विशेषतः नाबार्डमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने फिशरीज सोसायट्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी खेड येथील हॉटेल बिसू येथे करण्यात आले. कुवेत येथे वास्तव्यास असलेले खेडचे उद्योजक अस्लम हजवानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. कोकण विभागातील मच्छीमार सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी नाबार्डचे प्रशांत चहांदे, गुहागर फिशरीज विभागाचे स्वप्नील चव्हाण, नाबार्डचे संजय वाघोदे, फिशरीज कन्सल्टंट उमेश चव्हाण, जितेंद्र पाटील, गुलाम हुसेन हजवानी, हनीफ घनसार तसेच विविध मच्छीमार सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी मच्छीमार बांधवांना शासनाच्या विविध योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, व्यवसायवृद्धीसाठी उपलब्ध असलेल्या संधी तसेच सोसायट्यांच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उद्योजक बशीर हजवानी तसेच हॉटेल बिसूचे मालक शमीम तांबे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

टाइम्स स्पेशल

मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांच्या माध्यमातून उपाययोजना कशा करता येतील, याबाबत या शिबिरात सविस्तर चर्चा करण्यात आली. मच्छीमार समाजाच्या आर्थिक व व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांची आवश्यकता असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांपर्यंत शासनाच्या योजना व व्यवसायाच्या नव्या संधी पोहोचविण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्याचा मानस अस्लम हजवानी यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे मच्छीमार सोसायट्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी निश्चितच मार्गदर्शन व दिशा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg