loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यालगतची झाडी-झुडपे तोडण्याची मागणी

मळेवाड - आरोंदा-मळेवाड तसेच मळेवाड-शिरोडा मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी-झुडपे सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, अपघातास निमंत्रण ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर आला असून, या काळात या मार्गावर वाहनांची व प्रवाशांची मोठी वर्दळ वाढणार आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडी झुडुपांमुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या झाडी झुडुपांमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहेत.

टाइम्स स्पेशल

त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आरोंदा-मळेवाड व मळेवाड-शिरोडा मार्गालगतची वाढलेली झाडी-झुडपे साफ करावीत, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg