loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग ५ मधून 'महायुती'च्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग ५ मधील नगरसेवकपदाच्या उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. या प्रभागातील महायुतीचे उमेदवार सौरभ मलुष्टे, पूजा पवार आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाचणे येथील ऐतिहासिक नवलाई मंदिरात करण्यात आला. प्रचाराचा धार्मिक पद्धतीने श्रीगणेशा करत, नवलाई देवीच्या चरणी श्रीफळ आणि महायुतीचा जाहीरनामा ठेवून प्रचाराचा सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधील महायुतीचे दोन्ही उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्या प्रचाराला प्रभागातील शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभाला जमलेली ही अभूतपूर्व गर्दी म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते श्री. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून या प्रभागात केलेल्या भरघोस विकासकामांना मिळालेली जणू पोचपावतीच ठरली. महायुतीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधत, प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

प्रचाराच्या या पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या सर्वांनी दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देत, महायुतीच्या विजयासाठी एकजूट दाखवली. या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपस्थित नागरिकांचा उत्साह, पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासकामांवरील नागरिकांचा विश्वास आणि शिल्पा सुर्वे यांच्या मागील नेतृत्वाचा आधार पाहता, प्रभाग ५ मधून महायुतीला 'रेकॉर्ड ब्रेक' मतदान होईल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा प्रभाग महायुतीला मोठा विजय मिळवून देण्यास सज्ज असल्याचे चित्र आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg