loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम मंदिरात उद्यापासून सलग ३ दिवस भगिनींच्या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धा

रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिरात श्रावणी मंगळागौर निमित्त उद्या सोम. दि. २४ ते बुध. दि. २६ ऑगस्ट असे सलग ३ दिवस भगिनींच्या झिम्मा फुगडी व उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने श्रावणी मंगळवार निमित्त भगिनींचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भगिनींच्या झिम्मा व उखाणा स्पर्धा व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सोम. दि. २४ ते बुध. दि. २६ ऑगस्ट २०२६ असे सलग ३ दिवस दररोज सायं. ४ ते ७ या वेळेत संपन्न होतील. हे कार्यक्रम श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी भगिनींच्या विविध प्रकारच्या झिम्मा फुगडी स्पर्धा व उखाणे स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होतील. या झिम्मा फुगडी स्पर्धेत भगिनी वैयक्तिकरित्या तसेच भगिनी मंडळे विविध स्वरुपाचे कार्यक्रम सादर करतील. या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभागी होणार्‍या भगिनी विविध प्रकारच्या फुगड्या सादर करतील. त्यामध्ये साधी फुगडी, गवळण, दंड फुगडी, लाटणे फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिकूट फुगडी, चौकट फुगडी, बस फुगडी, एकेरी वा दुहेरी फुगडी अशा विविध प्रकारच्या फुगड्या भगिनी व युवती सादर करणार आहेत. या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धेतील विजेत्यांना पुढील प्रमाणे आकर्षक बक्षिसे देण्यात येतील - १) झिम्मा - झिम्मा नारी पुरस्कार २) फुगडी - फुगडी ग फुगडी पुरस्कार ३) घागर घुमविणे - हेऽऽ घुमिव पुरस्कार ४) जात्यावरील ओव्या - कंठ पुरस्कार ५) छुई - फुई - ताल पुरस्कार ६) उखाणे - तल्लख पुरस्कार ७) घोडा - घोडा - चपळ पुरस्कार ८) काटवट काणा - तोल-मोल पुरस्कार ९) सुप नाचविणे - नृत्य कौशल्य पुरस्कार १०) पारंपारिक वेशभूषा - संस्कृती पुरस्कार.

टाइम्स स्पेशल

श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे श्रावणी मंगळवार निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भगिनी व युवतींच्या या झिम्मा फुगडी व उखाणे स्पर्धेत रत्नागिरी शहर व परिसरातील तसेच जिल्ह्यातील भगिनींनी सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg