loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’; आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

पनवेल : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६’ मध्ये पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या उल्लेखनीय सन्मानाबद्दल आमदार विक्रांतदादा पाटील यांनी संजय कदम यांचा सत्कार करून अभिनंदन केले. पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ, सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संजय कदम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी संजय कदम यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून समाजातील जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संजय कदम यांनी अनेक वर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या प्रसंगी माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, नगरसेविका स्नेहल ढमाले-पाटील, मोहिनीताई विक्रांत पाटील, ढमाले उपस्थित होते. तसेच ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे विश्वस्त गणेश कोळी व अ‍ॅड. मनोज म्हात्रे यांनीही संजय कदम यांचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

संजय कदम यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, जनसामान्यांच्या समस्या आणि विविध सार्वजनिक विषयांना सातत्याने वाचा फोडली आहे. त्यांच्या या कार्याचा झालेला गौरव पनवेलच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg