loader
Breaking News
Breaking News
Foto

शिष्यवृत्ती परीक्षेत मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेच्या पार्थ कामतेकरचे उल्लेखनीय यश

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थी पार्थ राजेश कामतेकर याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पार्थने मालवण तालुक्यातील शहरी विभागातून प्रथम क्रमांक मिळविला असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ वा क्रमांक पटकावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पार्थच्या या यशामुळे मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पार्थच्या या यशाबद्दल मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते आणि मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या उपस्थितीत नुकताच सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg