loader
Breaking News
Breaking News
Foto

गोठे ग्रामपंचायतीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

मंडणगड (प्रतिनिधी) : गोठे ग्रुप ग्राम पंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रामधील गावातील पहीली ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. गोठे ग्राम पंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि उपसरपंच संजय बोतरे तसेच सरपंच अंजली घागरुम, ग्राम पंचायत अधिकारी दिपक टेमकर, उमेश घागरुम आदींनी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून हा महत्त्वाचा निर्णय घेऊन तो यशस्वीही करून दाखवलेल्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला मंडणगड पंचायत समितीचे माजी सभापती दौलत पोस्टूरे, विनोद जाधव, रिया बंगाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीजा भुवड, गोठे गावचे अध्यक्ष शांताराम भुवड आदि मान्यवरांसह गोठे, बोरखत, धामणी, गोठे खलाटी, कळकवणे, सिध्दार्थनगर तसेच बोरखत बौद्धवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड तालुक्यातील गोठे ग्रुप ग्रामपंचायतीने उपसरपंच संजय बोतरे यांच्या अथक परिश्रमाने नियोजन पूर्वक आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये विविध प्रकारची सार्वजनिक हिताची विकास कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावली आहेत. काही प्रगती पथावर आहेत तर काही मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. तसेच काही मंजूर कामे पावसाळा संपताच सुरू करण्यात येणार आहेत. हे झाले विकास कामांचे मात्र वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही लाभ मिळून देण्यात ग्राम पंचायत यशस्वी झाली आहे. आपल्या ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सामाजिक ऐक्याचा सळोखा राखत त्यांच्यासाठी त्या त्या निमित्ताने कार्यक्रम राबवून ही ग्राम पंचायत तालूक्यात अव्वल ठरली आहे. अशा या ग्राम पंचायतीच्या माध्यमातून‌ तिरंगा थीम वर आधारित शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी रंगभरण स्पर्धा घेतली. रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपला उस्फुर्त सहभाग घेतला. विजेत्यांसह सहभागी विद्यार्थ्यांना गोठे ग्रामपंचायतीकडून पारितोषिक देऊन त्यांचा उचित गौरव केला. गोठे ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील अंगणवाडी ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या तब्बल १०० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आपले विद्यार्थी आणि शिक्षणाप्रती सामाजिक दायित्व पार पाडले.

टाईम्स स्पेशल

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप ग्राम पंचायत गोठेचे ग्राम पंचायत अधिकारी दिपक टेमकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोठे शाळेचे मुख्याध्यापक दिलीपकुमार मराठे, धामणी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश बर्जे, बोरखत शाळेचे मुख्याध्यापक राकेश पंदीरकर, कळकवणे शाळा मुख्याध्यापक श्रीमती उंडे, गोठे खलाटी मुख्याध्यापक बडक, भगत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका विद्या दवंडे, रिया घागरुम, अस्मिता शिंदे, निकिता पलणकर मदतनीस गीतांजली भुवड ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश महाडिक, प्रगती भुवड यांनी उत्तम असे सहकार्य करत प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. अशा आगळ्यावेगळ्या सामाजिक कामाचे गोठे ग्रुप ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक रहिवाशी ग्रामस्थ आणि महिलांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg