loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणचे आ. शेखर निकम यांनी ठणकावले, स्वबळावर १५ नगरसेवक निवडून आणणारच

चिपळूण (वार्ताहर) : महायुतीला समर्थन दिले असतानाही राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यात आले...मी माझा शब्द कधीही फिरवला नाही आणि या पुढे ही फिरवणार नाही...महायुतीच्या नगराध्यक्ष उमेदवाराला मतदान करून विजयी करू आणि स्वबळावर आम्ही आमचे पंधरा नगरसेवक निवडून आणू...असा विश्वास आ शेखर निकम यांनी आजच्या बैठकीनंतर व्यक्त केला आणि भूमिका ही जाहीर केली. महायुतीतुन राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष बाहेर आला आहे शिवसेना आणि भाजपा अशी युती न पाच्या निवडणुकीत झाली आहे. राष्ट्रवादीने पंधरा जगावर उमेदवार उभे केले आहेत. आज राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली त्या नंतर पत्रकारांशी आ. निकम यांनी संवाद साधताना त्यानी आपली भूमिका जाहीर केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिलेला शब्द पाळायचा हा माझा शिरस्ता आहे. मग किती नुकसान होते की फायदा हे बघत नाही याच भूमिकेमुळे आमचे नुकसान झाले आहे मात्र आम्ही शब्द बदलणार नाही. म्हणूनच महायुतीमधून आम्हाला बाहेर टाकले असले तरी आम्ही आमचा शब्द पळणार, असे आ निकम यांनी स्पष्ठ केले. महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांना आमचं समर्थन आहे आम्ही महायुतीत नसलो तरी आमचा पाठींबा महायुतीच्या नगराध्यक्ष उमेदवारालाच आहे नव्हे तर महायुतीचा नगराध्यक्ष चीनप मध्ये विजयी करू आणि आम्ही दिलेला शब्द पाळू सर्व कार्यकर्ते महायुतीच्या नगराध्यक्ष उमेदवाराचे काम करीत आहेत आम्हाला बाजूला केले त्याचा परिणाम आम्ही होऊ देणार नाही आम्ही आमच्या शब्दाशी बांधील राहून महायुतीचा धर्म पाळू असे आ निकम यांनी सांगितले

टाइम्स स्पेशल

महायुतीतून आम्हाला बाहेर टाकले आहे आम्ही एकाकी आहोत पण खचून जाणारे आम्ही नाही आम्हाला बाजूला का केले कशासाठी केले याचा विचार आम्ही करीत नाही आणि करणार नाही मात्र यावेळी आलेले हे आव्हान आम्ही स्वीकारून स्वबळावर लढू आणि जिकू ही असा विश्वास आ शेखर निकम यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे पंधरा उमेदवार आम्ही उभे केले आहे नव्हे तर ठरल्या प्रमाणेच झाले होते आता पर्याय नाही मात्र पंधरा जगावर उमेदवार उभे आहेत ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडून आणू आणि राष्ट्रवादीची ताकद आम्ही दाखवून देऊ असे आ निकम यांनी स्पष्ठ करताना आहे त्या स्थितीत आणि दणदणीत यश मिळणारच असा विश्वास त्यानी व्यक्त केला. माझ्याकडे पंधरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत एका पेक्षा एक सरस उमेदवार असल्याने शहराच्या विकासाची जाण असल्याने मतदार आम्हाला नक्कीच दणदणीत यश मिळवून देतील माझा शहरातील मतदारांवर विश्वास आहे असे आ. निकम यांनी शेवटी स्पष्ठ केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg