loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय तंत्र निकेतन, रत्नागिरी येथे संविधान दिन उत्साहात

रत्नागिरी: शासकीय तंत्र निकेतन, रत्नागिरी येथे आज, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'संविधान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या स्वीकृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संस्थेमध्ये सकाळी ११.०० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या मुख्य भागात, संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. संस्थेचे कार्यदेशक भूषण बेलवलकर यांच्या हस्ते सर्वप्रथम उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानंतर, संस्थेत उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मागोमाग सामूहिकपणे संविधान उद्देशिकेचे वाचन केले आणि संविधानातील मूल्यांप्रति आपली निष्ठा व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी, भारतीय संविधानाचे महत्व आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्ये याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी संविधानाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे या वाचनातून स्पष्ट झाले. अशा प्रकारे, शासकीय तंत्र निकेतन, रत्नागिरी येथे संविधानिक मूल्यांची जाणीव ठेवून आणि संविधानाच्या आदर्शांचा सन्मान करत संविधान दिन साजरा करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg