पाली - बेणसे (धम्मशील सावंत) - अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव तीव्र झाला असून इराणने प्रत्युत्तरादाखल दुबईतील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पाली पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी राजेश मपारा यांचा मुलगा उत्कर्ष राजेश मपारा हा दुबई येथे शिक्षणासाठी गेला असून सध्या तो तेथे अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. उत्कर्ष मपारा हा दुबई इंटरनॅशनल अकॅडमिक सिटी परिसरातील एसपी जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही भागात हालचालींवर निर्बंध लागू करण्यात आल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच वडील राजेश मपारा यांनी आपल्या मुलाची सविस्तर माहिती पाली पोलीस स्टेशन येथे सादर केली असून प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती मदत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तो ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजमध्ये मुंबई पुण्यातील देखील विद्यार्थी शिकत आहेत, असे राजेश मपारा यांनी सांगितले. देशातील अनेक विद्यार्थी शिक्षण व नोकरीं या कामी परदेशात वास्तव्यास असतात, अशात कोणत्याही राष्ट्रात अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की तणावपूर्ण वातावरण दिसून येते. येथील नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणणे ही मोठी जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे आहे. आजच्या युद्ध परिस्थिती दरम्यानचे सतत चे बदलते वातावरण चिंतेचे असल्याने पालक म्हणून आम्ही चिंताग्रस्त आहोत. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परराष्ट्र मंत्रालयामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाल्यानंतर परदेशात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज्य आणि केंद्र सरकारची यंत्रणा किती सज्ज आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची नोंद, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, तातडीची स्थलांतर योजना याबाबत ठोस मार्गदर्शक तत्त्वे स्थानिक प्रशासनाकडे आहेत का? की प्रत्येक वेळी पालकांनाच धावपळ करावी लागणार? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कुटुंबीयांचा नाही, तर शासनाच्या जबाबदारीचाही आहे याची जाणीव संबंधित यंत्रणांनी ठेवणे गरजेचे आहे.

















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.