खेड - खेड तालुक्यातील युवा उद्योजक तथा जामगे गावचे सुपुत्र शैलेशदादा कदम यांना खेड शहर मराठा सेवा संघाच्या वतीने युवा उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाजाचे आणि तालुक्याचे नाव उंचावल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. शैलेशदादा कदम यांनी अत्यंत कमी वयात उद्योग क्षेत्रात पदार्पण करून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर व्यवसाय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार करत अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत खेड शहर मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैलेशदादा कदम हे जामगे गावचे सुपुत्र असून ते रामदासभाई कदम यांचे पुतणे तसेच राज्याचे गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे चुलत बंधू आहेत. कुटुंबातील राजकीय व सामाजिक परंपरेचा वारसा जपत त्यांनी उद्योग क्षेत्रातही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. या सन्मान सोहळ्यावेळी शहर अध्यक्ष शरद शिर्के, उपनगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, अंकुश विचारे, रोहन विचारे, दिपक नलावडे, सुनिल सावंत, सुनिल साळोखे, राजू आंब्रे, संदीप नायकवडी, प्रशांत सावंत, सुरेश चिकणे, मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शैलेशदादा कदम यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे येऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. शैलेशदादा कदम यांच्या या सन्मानामुळे खेड तालुक्यासह जामगे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या यशामुळे इतर तरुणांनाही उद्योग क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.