खेड : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी आयसीएस महाविद्यालय, खेड, रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. या उपक्रमात NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्येक जवानासाठी एक राखी आणि आपुलकीने लिहिलेले पत्र पाठविले. या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या शौर्याला, त्यागाला आणि देशसेवेला मनःपूर्वक सलाम केला. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या जवानांप्रती विद्यार्थ्यांच्या मनातील प्रेम, आदर आणि कृतज्ञता या उपक्रमातून व्यक्त झाली.
यावेळी NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. के. केळकर, प्रा. एस. व्ही. म्हस्के आणि प्रा. एस. एस. काडगे यांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा संदेश दिला. देशाच्या सुरक्षेसाठी जवान करत असलेल्या अमूल्य कार्याला सलाम करत,“आपण सुरक्षितपणे सण साजरे करू शकतो, कारण आपले जवान सीमेवर खंबीरपणे उभे आहेत,”अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राखी आणि पत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जवानांना “तुम्ही सीमेवर एकटे नाही, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे,”असा भावनिक संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि जवान यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना निर्माण होण्यास मदत झाली.
या उपक्रमाचे महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी कौतुक केले. तसेच रत्नागिरी विभागाचे NSS समन्वयक डॉ. मराठे यांनीही NSS स्वयंसेवकांच्या या उपक्रमाचे व सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.























.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.