loader
Breaking News
Breaking News
Foto

स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशन आणि लायन्स क्लब संगमेश्वर यांच्या संयुक्त वस्त्रदान योजनेच्या पहिल्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशन आणि लायन्स क्लब संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या जुने-नवे, सुस्थितीतील चांगल्या कपड्यांच्या माध्यमातून “संयुक्त वस्त्रदान योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील वस्त्रदान शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी भाकर संस्था, लांजा* येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाकर संस्था संचालित या वृद्धाश्रमात एकूण २० वयोवृद्ध असून, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध झालेली वस्त्रे त्यांना प्रेमपूर्वक वितरित करण्यात आली. समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम शक्य झाला असून, गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. यावेळी भाकर संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील तसेच भाकर संस्थेचे हितचिंतक प्रदिपकुमार बेंडखळे उपस्थित होते. स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष हरिचंद्र फेपडे, संस्थापक व कार्यवाह सचिव दिपक फेपडे आणि सभासद गंगाराम फेपडे उपस्थित होते. लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने अध्यक्ष लायन रविकांत शिंदे, उपाध्यक्ष व खजिनदार ला. मनीष चोचे तसेच नावडी संगमेश्वरचे सरपंच ला. विवेक शेरे व माजी झोन चेअरमन ला. गुलाम पारेख उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमातून “दानातून सेवा आणि सेवेतून स्नेहबंध” हा सामाजिक संदेश देण्यात आला. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढेही आपल्या परीने चांगले कपडे उपलब्ध करून देऊन या वस्त्रदान उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशन आणि लायन्स क्लब संगमेश्वर यांच्या वतीने करण्यात आले. शेवटी भाकर संस्था चे संस्थापक देवेंद्र पाटील यांनी स्नेहबंध फाउंडेशन आणि लायन्स क्लब संगमेश्वर च्या माध्यमातून सर्व सेवाव्रती व दानशूर समाजाचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg