loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे अनेक शाळेत शालेय उपयोगी साहित्य वाटप

खेड, - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे राबविण्यात येत असलेल्या शालेय उपयोगी साहित्य वाटप या समाजोपयोगी उपक्रमांतर्गत आज रजवेल केंद्रातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा मुंबके, जिल्हा परिषद शाळा शिर्शी, जिल्हा परिषद शाळा रजवेल, जिल्हा परिषद शाळा कर्जी कुणबी आणि जिल्हा परिषद शाळा कर्जी मराठी येथील विद्यार्थ्यांना वही, दप्तर, पेन्सिल, पाऊच तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षणाविषयीची आवड अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. नियमित अभ्यास, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. तसेच सेवानिवृत्त शिक्षक व लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षण हेच जीवनातील यशाचे खरे साधन असून, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे, मुंबके शाळेचे भुरुंगेकर, शिर्शी शाळेचे विखारे, महाडिक व मुख्याध्यापक साळुंखे, रजवेल शाळेच्या घोडके व सदावर्ते, रजवेल गावातील आंबेडकर व सकपाळ ताई, तसेच कर्जी कुणबी शाळेचे मर्चंडे व खरात उपस्थित होते. याशिवाय डायमंड सलूनचे सहकारी यश चव्हाण यांनीही उपक्रमात सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि समाधान पाहून हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्याच्या लायन्स क्लबच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. “We Serve” या लायन्सच्या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजहिताचे आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg