loader
Breaking News
Breaking News
Foto

बुरंबी गावचे सुपुत्र ज्ञानेश देसाई यांना ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप देसाई यांचे चिरंजीव ज्ञानेश प्रताप देसाई यांना ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, कर्तृत्व आणि यशस्वी वाटचाल केल्याबद्दल जीएसएल सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. चे ज्ञानेश प्रताप देसाई यांना हा मानाचा पुरस्कार ३० ऑगस्ट रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बुरंबी सर्वत्र अभिनंदन होत आहे. तरुण उद्योजक म्हणून ज्ञानेश देसाई यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने उद्योग क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशातून तरुण पिढीला उद्योजकतेची प्रेरणा मिळत असून, मेहनत, ध्येय आणि सातत्य यांच्या जोरावर यश संपादन करता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg