दापोली, (चंद्रशेखर जोशी) : ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष आणि मानवी मनोऱ्यांच्या थराराने हर्णे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव रंगला. जय भवानी प्रतिष्ठान हर्णे आयोजित, भारतीय जनता पार्टी दापोली व हर्णे पुरस्कृत ‘खेळ मांडला’ जिल्हास्तरीय प्रो गोविंदा स्पर्धेत हर्णेच्या श्रीनागेश्वर गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर नाव कोरले. हर्णे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर शनिवार (२२ ऑगस्ट) रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या दहा गोविंदा पथकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी केलेल्या चित्तथरारक प्रयत्नांना उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या स्पर्धेत गोवळकोट चिपळूणचे श्री गणेश गोविंदा पथक, दापोलीचे श्री देवी मरीआई प्रतिष्ठान पुरुष गोविंदा पथक, मार्कंडी चिपळूणचे श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक, जालगाव दापोलीचे हिंदुराज गोविंदा पथक, फणसवाडी हर्णेचे श्री नागेश्वर गोविंदा पथक, राजवाडी हर्णेचे श्री गजानन गोविंदा पथक, मोठी गोडीविहीर हर्णेचे श्री विठ्ठल गोविंदा पथक, धाकटी गोडीविहीर हर्णेचे श्री हिंदू एकता गोविंदा पथक आणि दापोली बुरटेवाडीचे श्री कृष्णाई गोविंदा पथक सहभागी झाले होते.
अटीतटीच्या लढतीत मार्कंडी-चिपळूणच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथकाला द्वितीय, गोवळकोट-चिपळूणच्या श्री गणेश गोविंदा पथकाला तृतीय, तर राजवाडी हर्णेच्या श्री गजानन गोविंदा पथकाला चतुर्थ क्रमांक मिळाला. विजेत्या गोविंदा पथकांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.






















.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.