loader
Breaking News
Breaking News
Foto

रिक्षा संघटनेकडून निखिल मोहितेचा गृहसत्कार; MPSC परीक्षेतील यशाबद्दल कौतुक

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावचे सुपुत्र निखिल अनिल मोहिते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक निबंधक श्रेणी-१ या पदांसाठी निवड मिळवली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कडवई-तुरळ-चिखली रिक्षा मालक-चालक संघटनेच्या वतीने त्यांच्या चिखली येथील राहत्या घरी जाऊन गृहसत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या हस्ते निखिल मोहिते यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निखिलच्या आई-वडिलांचाही पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निखिल यांचे प्राथमिक शिक्षण चिखली बौद्धवाडी येथील मराठी शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. यावेळी अध्यक्ष मिलिंद चव्हाण म्हणाले, “ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. निखिलचे यश चिखली गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून, ग्रामीण तरुणांसाठी ते प्रेरणादायी आहे.”

टाईम्स स्पेशल

सत्काराला उत्तर देताना निखिल मोहिते यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि संस्कारांना दिले. कष्टकरी रिक्षा बांधवांनी घरी येऊन केलेला हा सत्कार आपल्यासाठी अत्यंत मोलाचा असून, या सन्मानातून प्रशासनात जनतेच्या सेवेसाठी अधिक निष्ठेने काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष संदीप चिले, सचिव मोहन ओकटे, प्रमुख सदस्य विश्वनाथ कानाल, मनोज मोहिते यांच्यासह संघटनेचे चालक-मालक, निखिलचे आई-वडील, कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते. निखिलच्या यशाबद्दल उपस्थितांनी त्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg