संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोंड असुर्डे गावचे गणेश मूर्तिकार रविकांत अनंत चव्हाण यांच्या गणपतीच्या कारखान्यात विविध प्रकारचे गणपती रंगवताना दिसून येत आहेत. चव्हाण हे पैसा फंड येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना रंग कलेची आवड निर्माण झाली. त्यानंतर शाडू पासून गणपतीच्या एक फुटाच्या छोट्या छोट्या त्यांनी तीन मूर्ती बनवल्या. स्वतःचा आत्मविश्वास, आई-वडिलांचा पाठिंबा यामुळे कारखान्याचे स्वरूप निर्माण केले व गणपतीच्या मूर्ती विक्रीला सुरुवात केली.
पत्नी प्रांजली गेली २५ वर्षे उत्तम मदत करते. ज्येष्ठ पुत्र अनिरुद्ध गणेश कलेत पारंगत आहे. या कलेबरोबरच ड्रायव्हिंग, हार्मोनियम वादन इत्यादी कलेत तो प्रवीण आहे. यश हा कनिष्ठ पुत्र देखील या कामात उत्तम मदत करतो. तो देखील या गणपती बरोबरच ड्रायव्हिंग व हार्मोनियम वादन यामध्ये कलावंत आहे. यावर्षी कारखान्याला ३३ वर्षे पूर्ण झाली. कारखान्यात सध्या विविध प्रकारच्या सुमारे १०५ मूर्ती रंगविल्या आहेत.
सानिका शिंदे पेंटिंग बरोबरच गणपतीला वस्त्र, धोतर सजावट, डायमंड वर्क, फेटा, उत्तम क्वालिटी व सुंदर फिनिशिंग करतात.स्वरा चव्हाण, अथर्व, अर्पिता संसारे आदी कलाकार कारखान्यात रंगाचा शेवटचा हात फिरवीत आहेत. कुंभार खाणी, भातगाव, फणसवणे, लोवले, फुणगुस, माभळे, ओझरखोल, कसबा इत्यादी गावातून गणपतीला मागणी आहे.कारखान्यात एक फूट ते पाच फूट पर्यंत उंचीच्या मूर्ती आहेत. एकूणच रविकांत चव्हाण कुटुंबीयांमध्ये कलेचा सुरेख संगम दिसून येतो. कारखान्यात रंग कामाची सध्या लगबग दिसून येते.
















.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.