loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवचरित्र स्पर्धा व इंडियन टॅलेंट ऑलंपियाड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

खेड (प्रतिनिधी) - रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेतील व इंडियन टॅलेंट ऑलंपियाड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पारितोषिक वितरण सोहळ्याची सुरूवात उपस्थित प्रमुख मान्यवर डॉ. परेश मळणगांवकर, डॉ. चिखले व विराज चिखले यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर यांच्या शुभहस्ते पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण वर्षभरात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा व इतिहासाचा परिचय व्हावा, या उद्देशाने विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्यात्यांकडून शिवचरित्रावर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार, पराक्रम आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाची प्रेरणा मिळाली. सदर शिवचरित्र स्पर्धेतील 140 यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इंडियन टॅलेंट ऑलंपियाडमध्ये उत्तम यश संपादित त्रिवेणी गमरे हिने ITO परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत 1200 रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मेडल व कविश केकाणे याने IMO परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळवून 700 रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मेडल मिळवले.

टाईम्स स्पेशल

याशिवाय उत्कृष्टता पुरस्कार विजेते म्हणून वीर कालेकर (IMO परीक्षा राज्यात १५ वा क्रमांक), पूर्वी सूर्यवंशी (NLRO परीक्षा राज्यात १३ वा क्रमांक), स्वप्निल गोस्वामी (NSSO परीक्षा राज्यात २१ वा क्रमांक), आयुषा तांबट (IDO परीक्षा राज्यात १७ वा क्रमांक) आणि दिग्विजय धुमाळ (ISO परीक्षा राज्यात १९वा क्रमांक) यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायली मोडक, ओंकार काष्टे व प्रिया चिले यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली मोडक यांनी केले. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg