दापोली (वार्ताहर) : दापोली तालुका व परिसरातील आरोग्यसेवा अधिक सुरक्षित, सुसंवादी आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने दापोलीतील वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र येत ‘डॉक्टर्स टास्क फोर्स दापोली तालुका’ ची स्थापना १३ ऑगस्ट २०२६ रोजी केली आहे. या टास्क फोर्सची पहिली बैठक २० ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक तसेच विविध आरोग्यसेवा केंद्रांमध्ये काम करताना डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर आरोग्यसेवा कर्मचार्यांना काही वेळा गैरसमज, वादविवाद किंवा तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जावे लागते. अशा प्रसंगी परिस्थिती अधिक चिघळू न देता संवाद, समन्वय आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविणे, तसेच संबंधित आरोग्यसेवा कर्मचार्यांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे, हा या टास्क फोर्सचा प्रमुख उद्देश आहे. रुग्ण आजारी असताना त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांमध्ये चिंता, काळजी किंवा मानसिक तणाव असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत संवादातून गैरसमज दूर करणे आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे, यावर टास्क फोर्सचा भर राहणार आहे. ही टास्क फोर्स रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांविरोधात नसून, रुग्णांना योग्य व सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी आणि डॉक्टर व आरोग्यसेवा कर्मचार्यांनाही सुरक्षित वातावरणात आपले कर्तव्य बजावता यावे, या दोन्ही बाबींचा समतोल साधण्यासाठी कार्य करणार आहे.
डॉक्टर व आरोग्यसेवा कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक प्रयत्न करणे. रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्यसेवा कर्मचार्यांमध्ये प्रभावी संवाद व समन्वय वाढवणे. गैरसमज किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास ती शांततेने हाताळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करणे. अनुचित घटना घडल्यास संबंधित आरोग्यसेवा व्यावसायिकांना योग्य वेळी मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा व संबंधित विभागांशी समन्वय साधणे. दापोलीतील विविध आरोग्यसेवा घटकांमध्ये परस्पर सहकार्य व एकजूट वाढवणे. रुग्णांना सुरक्षित, दर्जेदार आणि सन्मानपूर्वक आरोग्यसेवा मिळण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे. ही टास्क फोर्स केवळ डॉक्टरांपुरती मर्यादित नसून दापोलीतील संपूर्ण आरोग्यसेवा क्षेत्राच्या समन्वयातून कार्य करणार आहे. यामध्ये अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी तसेच विविध उपचारपद्धतींचे व्यावसायिक यांच्यासोबतच परिचारिका, रक्त तपासणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन व इतर निदान सेवा देणारे तंत्रज्ञ, रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर आरोग्यसेवा व्यावसायिक यांचा समन्वय साधला जाणार आहे.
या टास्क फोर्सच्या स्थापनेत पुढाकार घेणार्या डॉक्टरांमध्ये पुढील १३ डॉक्टरांचा समावेश आहे. डॉ. कौस्तुभ रानडे, डॉ. संजय बागडे, डॉ. संदेश लखमदे, डॉ. नरेश पटवर्धन, डॉ. कुणाल मेहता,डॉ. सुयोग भागवत, डॉ. विद्या दिवाण, डॉ. विनोद जोशी, डॉ. शिरीष फाटक, डॉ. अनिरुद्ध डोंगरे, डॉ. प्रसाद करमरकर, डॉ. शबनम मुकादम, डॉ. काझिम खोत आदी डॉक्टरांचा समावेश आहे. आरोग्यसेवा ही डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक आणि विविध आरोग्यसेवा कर्मचार्यांच्या परस्पर सहकार्यावर आधारित असते. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी योग्य संवाद साधणे, तसेच डॉक्टर व आरोग्यसेवा कर्मचार्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, या दोन्ही बाबींना समान महत्त्व देण्यात येणार आहे. कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यास ती वाढविण्याऐवजी संवादातून आणि समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. गंभीर परिस्थितीत आवश्यकतेनुसार प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात येणार आहे. दापोलीतील संपूर्ण आरोग्यसेवा क्षेत्र अधिक सुरक्षित, सक्षम आणि सुसंवादी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सुरक्षित आरोग्यसेवा, सक्षम आरोग्यव्यवस्था आणि सर्वांसाठी विश्वासाचे वातावरण या व्यापक उद्देशाने ‘डॉक्टर्स टास्क फोर्स दापोली तालुका’ कार्यरत राहणार आहे.






















.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.