loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जत आगारातून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस सुरू करा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपोषणाचा इशारा

कर्जत, (जयेश जाधव) - पिल्ले कॉलेज, रसायनी व पनवेल येथे शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, कर्जत आगारातून अतिरिक्त एसटी बससेवा तातडीने सुरू करावी, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत शहराध्यक्ष अ‍ॅड. भाऊसाहेब मोरे यांनी कर्जत एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कर्जत परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच महिला प्रवासी एसटीने प्रवास करतात. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या अपुर्‍या बससेवेमुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कॉलेजच्या वेळेत केवळ एकच बस उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असून, सकाळी तसेच दुपारी कॉलेज सुटण्याच्या वेळेत कर्जत एसटी प्रशासनाकडून पुरेशी बससेवा उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बर्‍याच वेळा नादुरुस्त बसदेखील रस्त्यावर सोडल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा बस कर्जत-पनवेल मार्गावर दुतर्फा उभ्या केल्या जात असल्याने कर्जत चारफाटा, चौक चारफाटा तसेच पनवेलकडे जाणार्‍या मार्गावर वाहतुकीची कोंडी व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

पनवेल व रसायनी येथे शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नवीन बस उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे कर्जत आगाराला आणखी काही अतिरिक्त बस उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. वारंवार प्रवासी भाडेवाढ करूनही जनतेचे हाल सुरूच राहणार असतील, तर कर्जत आगारात उपोषण तसेच जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. भाऊसाहेब मोरे यांनी दिला आहे, असेही निवेदनात शेवटी नमूद करण्यात आले आहे. यावेळी राम देशमुख (शहर उपाध्यक्ष) व दिलीप बंधाटे (शहर सचिव) उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg