खेड (दिलीप देवळेकर) - गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसेना खेड तालुका महिला आघाडी आयोजित तालुकास्तरीय ‘नारी शक्ती मंगळागौर सोहळा २०२६’ या भव्य स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात समारोप झाला. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे तसेच महिलांमध्ये एकोपा, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभाग वाढावा, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध महिला मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
फुगड्या, पारंपरिक मंगळागौर खेळ, नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषेतील महिलांच्या उत्कृष्ट कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रथम क्रमांक — भाग्यलक्ष्मी मंगळागौरी ग्रुप, गुणदे रोख पारितोषिक ₹३५,०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक — रुक्मिणीदेवी महिला मंडळ, खेड रोख पारितोषिक ₹२५,०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक — काळकाई कृपा, भरणे-जाधववाडी रोख पारितोषिक ₹१५,०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह स्पर्धेचे परीक्षण वर्षा भट-बर्वे (दिवेआगर, श्रीवर्धन) आणि अर्चना जोशी (रत्नागिरी) यांनी केले. पारंपरिकता, सादरीकरण कौशल्य, वेशभूषा आणि एकूण कलाविष्काराच्या आधारे त्यांनी निकाल जाहीर केला.
यावेळी श्रेया योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती डॉ. आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील, जाई आंब्रे, खेड नगराध्यक्षा माधवी बुटाला, सुप्रिया पवार, नेहा दळी, मुग्धा भोसले, सिद्धी शिंदे, तसेच शिवसेनेचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने, पारंपरिक संस्कृतीच्या जल्लोषाने आणि अप्रतिम कलाविष्काराने ‘नारी शक्ती मंगळागौर सोहळा २०२६’ हा सोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला!
















.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.