loader
Breaking News
Breaking News
Foto

मंगळागौरीची संस्कृती, परंपरा महिलांनी जपली, राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून कौतुक

वाकवली (प्रतिनिधी) - महिलांनी मंगळागौरीची परंपरा जपली आहे. हा वारसा जपला आहे, हे पाहून आनंद होतो. आज या स्पर्धेला आपली पत्नी श्रेया कदम हिच्यामुळे मला मुंबईतला कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाला यावं लागल, असं सांगत शिवसेना महिला आघाडी कडून आयोजित कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केल. शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे शिवसेना महिला आघाडीकडून आयोजित मंगळागौर स्पर्धेत ते बोलत होते. कदम पुढे म्हणाले की, या स्पर्धेला मिळालेला महिलांचा प्रतिसाद पाहता आता आपली परंपरा संस्कृती जपणारी ही मंगळागौर स्पर्धा आता दरवर्षी भरवली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना महिला आघाडीकडून आयोजित मंगळागौर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या श्रेया कदम, नगराध्यक्ष कृपा घाग, सभापती उन्मेश राजे, उपसभापती नम्रता तोडणकर आदी उपस्थित होते. श्रावण महिन्यात कोकणात मंगळागौरींचे कार्यक्रम रंगले आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील दापोली येथे झालेला मंगळागौर स्पर्धेत दापोली शहर परिसरातील मैत्री ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक झिम्मा क्वीन तर तृतीय क्रमांक काळकाई देवी ग्रुप या मंगळागौर स्पर्धेचे मानकरी ठरले आहेत. मंगळागौर पूजन व रात्री जागवली जाणारी मंगळागौर हा महिलांसाठी मोठा उत्साहाचा सण असतो. कोकणातील ग्रामीण भागात आजही श्रावण महिन्यात मंगळागौरी पूजन केले जाते. कोकणातील ही परंपरा असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे आयोजन दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात करण्यात आल आहे.

टाईम्स स्पेशल

दापोली शहर व आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या महिलांच्या मैत्री ग्रुपचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. मानकरी ठरलेल्या या मैत्री ग्रुपच्या महिलांनी दापोली शहराचे दैवत असलेल्या बाजारपेठेतील श्री पंचमुखी महारुद्र हनुमानाच्या मंदिरात जाऊन मारुतीरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी बाजारपेठ परिसरात या मैत्री ग्रुपचे बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी मनोज मेहता यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम व त्यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या शिवसेना महिला आघाडी कडून या पारंपरिक खेळाला प्रसाद देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेबद्दल दापोली तालुक्यातील महिला वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg