loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी शहराला शिस्त लावण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने आजपासून धडक ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेला धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे. आज सकाळी शहराचा मुख्य आणि गजबजलेला भाग असलेल्या साळवी स्टॉप परिसरामधून या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. नगर परिषदेच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील अवैध विक्रेते आणि रस्ते व्यापणार्‍या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, फूटपाथ आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले होते. तसेच वाहतुकीचा खोळंबा दररोजचाच बनला होता. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने आज सकाळपासूनच कारवाईचे अस्त्र उपसले. साळवी स्टॉप परिसरात रस्त्याच्या कडेला उभारलेली तात्पुरती व कायमस्वरूपी अनधिकृत दुकाने, टपर्‍या, शेड आणि रस्त्यावर लावलेले बेकायदेशीर फ्लेक्स, बोर्ड महापालिकेच्या पथकाने जेसीबी आणि इतर उपकरणांच्या साहाय्याने हटवण्यास सुरुवात केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या संपूर्ण मोहिमेदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकार्‍यांच्या आणि कर्मचार्‍यांच्या कडक पहार्‍यात ही मोहीम राबवण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

या धडक कारवाईत नगर परिषदेचे उच्च अधिकारी, अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जे नागरिक किंवा व्यावसायिक स्वतःहून अतिक्रमण हटवणार नाहीत, त्यांचे साहित्य जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. साळवी स्टॉपवरून सुरू झालेली ही मोहीम आगामी काळात शहरातील इतर प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेच्या भागांतही तीव्र केली जाणार असल्याचे समजते. नगर परिषदेच्या या कठोर भूमिकेमुळे सामान्य नागरिकांतून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg