आबलोली (संदेश कदम) - विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यात तन-मन-धनाने स्वतःला झोकून देऊन काम करणारे आणि बौद्धजन सहकारी संघ (रजि.) तालुका गुहागर शाखा क्रमांक २३ गिमवी या धम्म संघटनेचे गाव व मुंबई शाखांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी दिवंगत शंकर गंगाराम सुर्वे (सुर्वे गुरुजी) यांचे दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गुहागर तालुक्यातील बौद्ध समाजावर शोककळा पसरली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे शीर संवाद काम करणारे अनुयायी म्हणून सुर्वे गुरुजी गुहागर तालुक्यात परिचित होते. त्यांनी सामाजिक बांधिलकी करताना समाज एक संघ कसा राहील यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. निस्वार्थीपणे काम करताना कधीही ते डगमगले नाहीत. किंवा कुठल्याही आमिषाला ते बळी पडले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काम आणि धम्माचे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. बौद्धजन सहकारी संघ या धम्म संघटनेचे संघटनही त्यांनी मजबूत केले. बौद्ध समाजाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर्व समाजाला संघटित करण्याचे कामहि त्यांनी केले होते. गिमवी गाव एक संघ राहण्यासाठीही त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.
अशा या बौद्ध समाजातील जेष्ठ कार्यकर्ते आणि भीमसैनिक असलेल्या दिवंगत शंकर गंगाराम सुर्वे यांचा प्रथम स्मृतिदिन गुरुवार दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:४५ वाजता गुहागर तालुक्यातील गिमवी बौद्धवाडी येथे बौद्धजन सहकारी संघ (रजि.) शाखा क्रमांक २३ गिमवी, गाव व मुंबई शाखा तसेच सुर्वे कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून समाज बांधवांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन आयु. चंद्रकांत शंकर सुर्वे, आयु. संतोष शंकर सुर्वे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.











































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.