loader
Breaking News
Breaking News
Foto

बनोटी शाळेत विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा

म्हसळा - तालुक्यातील केंद्र वरवठणे मधील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बनोटी या शाळेत शासनाच्या आदेशानुसार भारतीय संविधान दिनाचे आयोजन २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० करण्यात आले होते. सर्वप्रथम संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संविधान उददेशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान विषयी पथनाट्य, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन शालेय स्तरावर उपक्रम घेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिलीप करंबे - माजी केंद्र प्रमुख तथा विस्तार अधिकारी यांनी संविधानातील मुलभूत हक्क आणि अधिकार कर्तव्य यांची ओळख करून दिली . नागरिक म्हणून कर्तव्य भावना विकसित करणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता वाव देणे, संविधानातील मूल्यांची कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे, विद्यार्थ्यांमध्ये संविधान विषयी ज्ञान वाढवणे, समाजात संविधानीक मूल्यांची जनजागृती करणे याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली. शाळा स्तरावर घेण्यात आलेले विविध उपक्रम यांचे यशस्वीपणे अंमलबजावणी. केल्याबद्दल पोलिस पाटील अनंत पाटील यांनी शालेय विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg