loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभाग क्रमांक ६ मध्ये NCMC कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; १८५ नागरिकांचा सहभाग

रत्नागिरी : तालुक्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत आणि लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आधुनिक, सुलभ आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये NCMC कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना नगरसेविका मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना नगरसेवक राजीव यशवंत कीर यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी (२३ ऑगस्ट) हे शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विशेष शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक ६ मधील तब्बल १८५ नागरिकांनी NCMC कार्डसाठी नोंदणी करून सहभाग नोंदविला. यामध्ये ६० मुली, ८० महिला आणि ४५ पुरुषांचा समावेश होता. NCMC कार्डच्या माध्यमातून बस प्रवासाचे तिकीट खरेदी अधिक सुलभ, सुरक्षित आणि स्मार्ट पद्धतीने करता येणार असून, पेमेंट व प्रवासासाठी एकाच कार्डचा वापर करता येणार आहे.

टाईम्स स्पेशल

शिबिराच्या शुभारंभप्रसंगी रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांचे विभाग प्रमुख मनोज साळवी व उपविभाग प्रमुख नरेंद्र देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी NCMC कार्ड समृद्धी सर्विसेसचे संदीप चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. तसेच स्नेहा चव्हाण यांचे सोनाली सावंत यांनी, तर मैथिली भोसले यांचे विशाखा भिडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg