loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याची दुरुस्ती होणार, चार महिने कालवा राहाणार बंद राहणार

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त आंतरराज्य प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिलारी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याची स्थिती धोकादायक तसेच बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांत कालवे फुटून याचा परिणाम गोवा राज्यावर जाणवू लागला. या पार्श्वभूमीवर दोन्ही कालवे चार महिने बंद ठेवून युध्द पातळीवर दर्जेदार दुरुस्ती पुनर्स्थापना कामे सुरू केली जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी दोन्ही राज्यांच्या सहमतीने १ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंत दोन्ही कालवे बंद राहणार आहेत. तेव्हा सिंचनासाठी तिलारी कालव्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. अशी माहिती जलसंपदा विभागाकडून स्थानिक ग्रामपंचायतमार्फत शेतकर्‍यांना कळविली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याची बांधणी होऊन चाळीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे उलटली आहेत.

टाईम्स स्पेशल

अनेक ठिकाणी माती भराव टाकून तर काही ठिकाणी खोदकाम करून धरणाचे पाणी गोवा राज्यातील पेडणे, डिचोली तालुक्यातील काही गावात तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प यासाठी गोवा राज्यात देण्यासाठी कालवे तयार केले. यातील काही पाणी हे दोडामार्ग तालुक्यातील काही गावे बांदा सावंतवाडी मध्ये सिंचन प्रकल्प, शेती यासाठी पुरवठा केला जातो. आज दोन्ही कालवे धोकादायक स्थितीत असल्यामुळे दुरुस्ती शिवाय पर्याय नाही यामुळे महाराष्ट्र व गोवा सरकारने हा संयुक्त निर्णय घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg