loader
Breaking News
Breaking News
Foto

रानभाज्यांची चव अन् परंपरेची नवलाई; भाटघरमध्ये रंगले रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा

दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषी विस्तार विभागाद्वारे, ग्रामीण जीवन कार्यानुभव कार्यक्रमा (रावे) अंतर्गत भाटघर येथील हनुमान मंदिरात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. मुगीज येथील 'बीजांकुर', भाटघर येथील 'कृषी कन्या' आणि सोवेली येथील 'मृदगंधा' व 'वसुंधरा' या विद्यार्थी गटांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांमध्ये रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व आणि आहारातील वापर याबद्दल जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रादेशिक रावे प्रमुख डॉ. विजयकुमार देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात तब्बल ४० प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती देणारे फलक मांडण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​त्याचसोबत आयोजित पाककला स्पर्धेत ५३ महिलांनी सहभाग नोंदवून रानभाज्यांपासून मोमोज, कटलेट, भारंगीची खीर, पराठे, घावण आणि करंजी यांसारखे पारंपरिक व नाविन्यपूर्ण पदार्थ तयार केले. डॉ. प्रविण झगडे आणि डॉ. आशिष शिगवण यांनी चव, पौष्टिकता आणि सादरीकरणाच्या निकषांवर या पदार्थांचे परीक्षण केले. ​पाककला स्पर्धेचे विजेते: ​मुगीज–भाटघर गट: ​प्रथम: विजया कदम (भारंगी खीर) ​द्वितीय: अंकिता मदगुल (भारंगी कटलेट) ​तृतीय: अर्चना तांबे (टाकळा पुरी) ​उत्तेजनार्थ: प्राजक्ता खळे (कावेरीची वडी)

टाईम्स स्पेशल

​सोवेली (चव्हाणवाडी व सुतारवाडी) गट: ​प्रथम: मीनाक्षी शिंदे (मिक्स भाजी पराठा) ​द्वितीय: अरुणा चव्हाण (सुरणाची वडी) ​तृतीय: माधुरी चव्हाण (शतावरीची भजी) ​उत्तेजनार्थ: संजीवनी सोवेलकर (पेव्याची भाजी) दीपप्रज्वलन, महाराष्ट्र राज्य गीत आणि विद्यापीठ गीतातून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या प्रसंगी डॉ. विजयकुमार देसाई, राजेंद्र फणसे, डॉ. एस. एन. काळे, डॉ. आशिष शिगवण, डॉ. प्रविण झगडे, व्ही. डी. म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पारंपरिक खाद्यज्ञानाचे संवर्धन व शाश्वत वापराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण आणि मार्गदर्शक प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण झाले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg