loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंढेतील विद्यार्थ्यांचा प्रवीण शिंदे मित्र मंडळाने केला सन्मान

दापोली (प्रतिनिधी) : म्हणाव्यात तशा कोणत्याही प्रकारच्या आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही त्यावर मात करत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून कोंढे गावाच्या शैक्षणिक लौकिकात भर घालणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवीण शिंदे मित्र मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन मोठ्या उत्साहात गौरव करण्यात आला. कोंढे शाळा क्रमांक १, २ व ३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यात कोंढे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करून शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांची प्रविण शिंदे मित्र मंडळाने दखल घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या शैक्षणिक गुवत्तेचा उचित सन्मान केला. यामध्ये कोंढे शाळा क्रमांक १ मधील नम्रता तांबे, मुदिता कासारे व सांजवी शिगवण, शाळा क्रमांक २ मधील आराध्या करंजकर व साई गोरीवले, तसेच शाळा क्रमांक ३ मधील स्वरा भडवळकर व वेदा शिगवण हे विद्यार्थी पात्र ठरले. तसेच करंजाळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या एनएमएमएस परीक्षेत कोंढे येथील तनया शिवगण व मिहीर तांबे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाच्या शाबासकीची थाप मारुन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रविण शिंदे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप कासारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, माजी सरपंच मारुती चिपळूणकर, माजी उपसरपंच प्रमोद रहाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुबोध बोहिरे, माजी सरपंच राजाराम घोडेराव, विजय शिगवण, प्रवीण शिंदे मित्र मंडळाचे प्रवीण शिंदे, संतोष घोडेराव गुरुजी, नरेश कासारे, महेंद्र कासारे, विनोद रहाटे, यांचेसह तीनही शाळेतील शिक्षक, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg