loader
Breaking News
Breaking News
Foto

रात्री जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी झुडुपात दबा धरुन बसलेल्या दोघांच्या लांजा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - रात्रीच्या सुमारास जंगली प्राण्याची शिकार करण्यासाठी झाडाझुडपात दबा धरून बसलेल्या दोघांच्या लांजा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शनिवारी रात्री १.५५ वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून बारा इंच बोर काडतूस, बंदुक, चार जिवंत काडतुसे असा एकूण १० हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा पोलीसांचे एक पथक शनिवारी रात्री १.५५ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना आंजणारी शिरबंवली जाणा-या रस्त्यालगत ओवलाचा दांडा या परीसरात जंगली प्राण्यांच्या शिकार करण्यासाठी दिपक वसंत पाष्टे (वय ३३ रहाणार आंजणारी पाष्टेवाडी) आणि सुदर्शन श्रीकांत सावंत वय (३५ रहाणार कशेळी, नाणीज तालुका रत्नागिरी) हे दोघेजण झाडाझुडपात दबा धरून बसलेले आढळून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १२ इंच बोर काडतूस, बंदुक तसेच ४०० रूपये कीमतीची जीवंत काडतूस ५०० रूपये किंमतीची बॅटरी, असा एकूण १० हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जंगली प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने गैरकायदा बिगरपरवाना बंदुक आढळून आल्याने पोलिसांनी दिपक पाष्टे आणि सुदर्शन सावंत या दोघांवर भारतीय हत्यार अधिनियम १९५२ चे कलम ३(१)/२५ भारतीय न्याय संहीता २०२३चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास हेडकॉन्स्टेबल विलास जाधव करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg