loader
Breaking News
Breaking News
Foto

मळेवाड जकातनाका येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई, बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने दुकाने हटवली

मळेवाड जकात नाका येथील जुन्या शिरोडा रस्त्यालगत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर बांधकाम विभागाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृतपणे उभारण्यात आलेली दुकाने हटविण्यात आली. ही कारवाई सुरू असताना संबंधित दुकानदारांनी प्रशासनाला सहकार्य केले. दुकानदारांनी स्वतःहून दुकानांमधील साहित्य व इतर वस्तू बाजूला केल्याने कारवाईला सहकार्य मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले तसेच उपअभियंता अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आरोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश अरवारी, हेड कॉन्स्टेबल बाबुराव जाधव, पोलीस पाटील बाबुराव मुळीक यांच्यासह परिसरातील व्यापारी व दुकानदार उपस्थित होते. यावेळी जुना शिरोडा रस्ता खुला करण्यात आला. ही कारवाही दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

दुकानदारांचे सहकार्य

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg