loader
Breaking News
Breaking News
Foto

जनहित आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या शुभांगी सावंत यांची ’विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी निवड

रत्नागिरी : महाराष्ट्रात शासन सेवेच्या माध्यमातून जनहित आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या शुभांगी किरण सावंत यांची ’विशेष कार्यकारी अधिकारी’ या महत्त्वपूर्ण पदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणार्‍या या जबाबदारीमुळे त्यांना जनतेची सेवा करण्याची आणखी एक नवी संधी आणि नवीन ओळख मिळाली आहे. शुभांगी सावंत यांनी आपल्या प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावामुळे सामाजिक क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांच्या या उच्च पदावरील नियुक्तीमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये, मित्रपरिवारात तसेच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शुभचिंतक त्यांच्या कार्यालयात व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभकामना देत आहेत. त्यांच्या हातून समाजाचे उत्तमोत्तम कार्य घडावे, जनतेचा विश्वास आणि भरघोस प्रेम त्यांना लाभावे, तसेच त्यांच्या पुढील सर्व प्रवासात व वाटचालीत त्यांना यश मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे. एक नवीन जबाबदारी स्वीकारत त्या आगामी काळात लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि जनहितार्थ महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg